केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कधीपासून होणार वाढ?

0 26

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना आर्थिक भेट मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी करोनाचं संकट ओढवल्यानं केंद्र सरकारनं खर्चांना कात्री लावताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्ता वाढ रोखली होती. मात्र, आता आर्थिक गाडा रुळावर येताना दिसत असून, केंद्र सरकारकडून लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून वाढीव महागाई भत्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारकडून याबद्दल अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ती केली जाणार असल्याचं वृत्त आहे. केंद्र सरकारने करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे महागाई भत्त्यातील चार टक्के वाढ जुलै २०२१ पर्यंत रोखली होती.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापू्र्वी जुलै २०२० मध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. मात्र करोनानं शिरकाव केल्यानंतर केंद्र सरकारच्या महसूलावर मोठा परिणाम झाला. तिजोरीला फटका बसल्यानं केंद्राने ही वाढ गोठवली होती. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणेच महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. आता एकत्रित ११ टक्के वाढीसह तो दिला जाणार असल्यानं नव्या वाढीनंतर तो २८टक्के होणार आहे.

Related Posts
1 of 1,291

महागाई भत्त्यात करण्यात येणाऱ्या वाढीचा फायदा केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर ६० लाख निवृत्त कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याचा लाभ होणार आहे. विविध राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा वाढवला जातो. परंतु करोना संकटामुळे केंद्र सरकारच्या सरकारी तिजोरीवर परिणाम झाला. महागाई भत्त्यात जुलै २०२१ नंतरच वाढ होण्याची आशा सरकारनं व्यक्त केली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: