केंद्राच्या या निर्णयावर रोहित पवारांनी घेतला समाचार

1 86

करोना संकटाशी संपूर्ण देश आज दोन हात करत आहे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे राज्यासमोर अनेक आर्थिक प्रश्न पडले आहे. आरोग्य सुविधांवरील वाढता खर्चाचा ताण राज्याच्या तिजोरीत पडला आहे. अशी स्थितीत केंद्र सरकारनं राज्यांना आरटीपीसीआर टेस्ट किट, पीपीई किट आणि एन ९५ मास्क यांचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर चंगलीच टीका केली आहे.

Related Posts
1 of 2,052

रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका करताना म्हटलं कि आरोग्याचा वाढता खर्च या मुळे राज्याच्या तिजोरीवर जास्त प्रमाणात ताण येतोय. आरटीपीसीआर टेस्ट किट, पीपीई किट आणि एन-९५ मास्क याचा राज्यांना करण्यात येणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने का घेतला हा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेल्या राज्यांची आणखी कोंडी करण्याचा प्रकार आहे. ही करोना प्रतिबंधक साधने आजपर्यंत केंद्र सरकारकडून राज्यांना पुरवण्यात येत होती आणि खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही साधने केंद्राला कमी किंमतीतही मिळू शकतात. पण एकीकडं पेशंटची संख्या वाढत असताना या साधनांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय का घेतला हे कळत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
आज सर्वच राज्ये कोरोना मुळे संकटात सापडलेल्या अाहे त्यामुळं केंद्र सरकारने राज्यांना त्यांचे हक्काचे जीएसटीचे पैसे दिले पाहिजेत. पण ते देण्याऐवजी केंद्र सरकारने कर्ज घ्यायला सांगितलं आणि आता तर करोना सुरक्षा साधनांचा पुरवठाही थांबवायचा निर्णय घेतला. याला जबाबदारी घेणं म्हणत नाही. माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

Show Comments (1)
error: Content is protected !!
%d bloggers like this: