केंद्राकडून राज्यांना मिळणार 20 हजार कोटी !

0 41

कोरोना महामारीमुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे.आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने केंद्राने तातडीने GST चा परतावा द्यावा अशी मागणी राज्यांनी केली होती.यावर आता केंद्र सरकार राज्यांना 20 हजार कोटींचा निधी तातडीने देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यांना आता दिलासा मिळणार आहे.

तसेच केंद्राने राज्यांची नुकसानभरापाई नाकारलेली नसल्याचे स्पष्ट केले आणि राज्यांना कर्जाचा पर्याय देण्यात आल्याची माहिती दिली .कोरोना संकट हे अभूतपूर्व असल्याने सगळ्यांनी मिळून त्याचा मुकाबला केला पाहिजे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

Related Posts
1 of 253

तसेच आता ज्या कंपन्यांची उलाढाल 5 कोटीपर्यंत आहे त्या कंपन्यांना दर महिन्याला रिर्टन भरावे लागणार नाहीत.दर तीन महिन्याला रिर्टन भरण्यास त्यांना सुट देण्यात आली आहे. नक्कीच याचा फायदा छोट्या कंपन्यांना मिळणार आहे.दरम्यान महाराष्ट्रानेही केंद्राकडे जीएसटीची नुकसानभरापाई मिळावी याची मागणी केली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: