कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

0 33

पुणे –  आयपीएस अधिकारी आणि  पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.आयर्न मॅन खिताब पटकावल्याप्रकरणी ही नोंद करण्यात आली आहे.

 

ही कामगिरी करणारे देशातील पहिले अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळालाआहे.सरकारी कर्मचारी, सशस्त्र सेना, निमलष्करी दल, सनदी अधिकारी यांच्यातील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे कृष्णप्रकाश हे पहिलेच अधिकारी ठरले आहेत.

 

२०१७ मध्ये कृष्णप्रकाश यांनी Ironman Triathlon ही स्पर्धा जिंकली होती.जगातील अत्यंत खडतर स्पर्धा म्हणून याकडे पाहिलं जातं. स्पर्धकाला १६ ते १७ तासांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करायची असते.

 

यामध्ये सर्वप्रथम ३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे असे खडतर टप्पे असतात.फ्रान्समध्ये झालेल्या या स्पर्धेत २०१७ मध्ये विजेता होण्याचा मान कृष्णप्रकाश यांच्या नावावर झाला होता.

 

Related Posts
1 of 1,290

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी बुधवारी सकाळी ट्विटरला आपली नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाल्याची माहिती दिली.कृष्णप्रकाश यांनी ट्विटरला फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांना प्रमाणपत्र दिलं जात असल्याचं दिसत आहे.

 

कृष्णप्रकाश यांनी फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.अभिनेता सुनील शेट्टीनेही कृष्णप्रकाश यांचं अभिनंदन केलं असून तुमच्या यशासाठी फार आनंदी असून दुसरं कोणीही यासाठी पात्र असू शकत नाही असं म्हटलं आहे.

 

कृष्णप्रकाश यांच्याव्यतिरिक्त अभिनेता मिलिंद सोमण, आयपीएस अधिकारी रविंद्रकुमार सिंगल यांनीही ही खडतर स्पर्धा जिंकली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: