कृषी विधेयकावरुन शेतकरी संघटनांचा विरोध 

0 57

अकोले –  नव्या कृषी विधेयकावरुन आज शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.पंजाब बंदमध्ये ३१ शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.आज अकोले येथे ही काँम्रेड अजित नवले नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.कायदा नको स्वामीनाथन आयोग लागु करावा,कामगार विरोधी आणि  शेतकरी विरोधात कायदा करुन देश विकायला भाजप सरकार विकत असल्याची भावना शांताराम वाळुंज यांनी आपली भावना व्यक्त केली.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख म्हणाले की जे राज्यकर्ते शेतकर्याच्या पोटी जन्माला आले असते तरच त्यांना शेतकर्याच्या भावना कळल्या असत्या.मोदी साहेबांचे, भाजपाचे सरकार हे देशातील शेतकरी व कामगार विरोधी असल्याच म्हटल आहे.राजकारण विसरुन आपण सर्वांनी शेतकरी हितासाठी एकञ आले पाहिजे.यावेळी आमदार किरण लहामटे यांनी बोलताना म्हटल की.यावेळी पारित केलेल्या विधेयकाच्या प्रती जाळुन आज निषेध व्यक्त करण्यात आला.शेतकर्याांना स्वतंत्र देण्याची गरज असुन बड्या कोर्पोरेट घराण्याच्या ताब्यात देेेेण्याचा घाट घालण्यात आला आहे.शेतकर्याला मातीत घालण्याचे पाप भाजप सरकार करत आहे.देशात सर्वञ हे आंदोलन उग्र स्वरूपात होत आहे.भांडवलदारांच्या हातात शेतकरी सोपवण्याचे पाप मोदी सरकार करत आहे.असे अजित नवले यांनी आपली भावना व्यक्त केली.


यावेळी आमदार किरण लहामटे यांनी म्हटल आहे की देशभर आज आंदोलने मोर्चे होत आहेत.सर्व पक्षीय लोक आंदोलनात सामिल होत असल्याने भविष्यात या होणाऱ्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असणार आहे.एकीकडे कोरोना कालावधीत शेतकरी हतबल झालेला असताना त्यांना जाणीवपूर्वक हे विधेयक पास करुन शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे काम केले आहे.थोड्याच दिवसात हे विधेयक मागे घेण्यास भाग पाडणार असल्याच आमदार लहामटे यांनी बोलताना व्यक्त केल. मंञी कौर यांनी ही या विधेयकावरुन नाराज होऊन आपला राजीनामा दिला होता. तसेच देशामध्ये होणाऱ्या आंदोलनात संदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखणे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. संसदेत समंत करण्यात आलेल्या तीन शेती विधेयकामुळे कृषी बाजाराची व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा दावा केला जात आहे.

Related Posts
1 of 1,357

काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. शेतकऱ्यांविरोधात आणलेल्या या विधेयकावर काँग्रेसने पुढील २ महिने जनआंदोलन पुकारण्याची घोषणा केली आहे. मंगळवारीही पंजाब-हरियाणातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत या विधेयकाला विरोध केला. पंजाबमधील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीन दिवसांचे रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे.

त्यानंतर अनेक रेल्वे गाड्या स्थगित करण्यात आल्या. या आंदोलनमुळे २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष गाड्यांच्या १४ जोड्या धावणार नाहीत असे रेल्वे प्रसाशनाने कळवले आहे,यावेळी अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी प्रसाशनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.यावेळी काँम्रेड शांताराम वाळुंज,कारभारी उगले,विनयजी सावंत, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर,रवी मालुंजकर,जिल्हा उपाध्यक्ष बबनराव वाळुंज, महेशराव नवले,प्रमोद मंडलीक, हेरंब कुलकर्णी,विकासराव बंगाळ,चंद्रभान नवले,गणेश कानवडे,निखिल नवले ,जालिंदर बोडके,संतोष नाईकवाडी, संदिप भाऊसाहेब शेणकर,अभिजित वाकचौरे  आदी उपस्थित होते.         

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: