कृषी विधायकचा निषेध करण्यासाठी पाथर्डी तालुका काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा

पाथर्डी- केंद्र सरकारने कृषी विषयक धोरण शेतकऱ्यांच्या विरुद्ध पारित केले असून त्याचा निषेधार्थ पाथर्डी तालुका काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला होता.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, यांच्या मार्गदर्शनानुसार युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय सत्यजित दादा तांबे पाटील,युवक जिल्हा समन्वय राजेंद्र बोरुडे यांच्या सूचनेनुसार या विधेयकाच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा मशाल मोर्चाचे आयोजन केले होते.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या विरोधात बहुमताच्या जोरावर जे कृषिविषयक विधेयक संमत केले आहे.विधेयकाचे तरतुदी या अत्यंत जाचक आहेत शेतकरी बांधवांवर अन्याय करणारे आहेत. यामुळे भारतातील शेतकरी वर्ग विस्थापित होण्याचा धोका वाढला आहे. सदर करार पद्धत अस्तित्वात आल्यास गरीब शेतकरी वर्ग यामध्ये भरडला जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या अनेक तरतुदी या शेतकरी बांधवांवर अन्याय करणाऱ्या असून केंद्र सरकारने या हे विधेयक त्वरित रद्द करावे अन्यथा रस्त्यावर उतरू आंदोलन करू असे यावेळी कॉग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख म्हणाले .