कृषी कायद्यावरून राहुल गांधीचा मोदी सरकारवर निशाणा !

सध्या देशात आधीच मराठा , धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. आता देशात कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. शेकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे, आता माजी अध्यक्ष राहुल गांधीदेखील शेतकऱ्यांना पाठिंबा देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की ,नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील.चुकीच्या वस्तू आणि सेवा करानं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना संपवलं आहे .प्रियंका गांधी यांनीदेखील कृषी विधेयकावरून सरकारवर निशाणा साधला .या कायद्याने शेतकऱ्यांना कंत्रीटी शेतीद्वारे अब्जाधीशांचं गुलाम बनवण्यास प्रवृत्त केलं जाईल. यामुळे शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल. मात्र आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही असं प्रियांका म्हणाल्या .
दरम्यान या नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको केला.पंजाब, हरयाणात या आंदोलनाचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत.परिस्थिती लक्षात घेता दिल्लीत हरयाणा सीमेलगतची सुरक्षादेखील वाढवली आहे.