बीड – कुस्ती पट्टू राहुल आवारे अर्जुन पुरस्कार जाहीर….


बीड – कॉमनवेल्थ गेम्समधून सुवर्णपदक पटकवणारे पैलवान राहुल आवारे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील माळेवाडी येथील पै.बाळासाहेब आवारे यांचे सुपुत्र आहेत. शहरात वडिलांच्या तालमीत कुस्तीचे धडे घेऊन पुणे येथे काका पवार यांच्या तालमीत त्यांनी सराव केला, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता ठरले आहेत. कॉमनवेल्थ गेम्सच्या कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, त्यांच्या आयुष्यातील हा क्षण सुवर्णाक्षरात लिहला गेला आहे. भारत सरकारने अर्जुन खेलरत्न पुरस्कारासाठी राहुल आवारे यांची निवड केली आहे, राहुल आवारे यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून ते सध्या प्रशिक्षण पुर्ण करत असून ते लवकरच सेवेत येतील,