कुत्र्याच्या भांडणावरून वाद, एकाची दगडाने ठेचून हत्त्या…….

0 33

यवतमाळ दोन शेजाऱ्यामध्ये कुत्र्याच्या भांडणावरून वाद झाला आणि त्यातून दगडाने ठेचून हत्त्या करण्यात आली.  ही घटना यवतमाळ जवळच्या माळ मासोला गावात घडली. या नंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र पोलिसांच्या भूमिकेने गावातील संघर्ष टाळला.  या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली.

 दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर……..!!!!!!

माळ मसोला येथे चव्हाण आणि हागावणे हे दोन्ही कुटुंब गेल्या कित्येक वर्षा पासून शेजारी राहतात या दोन्ही कुटुंबा कडे पाळलेले कुत्रे आहे १६ डिसेंबर रोजी दोन्ही कुत्रे मोकळे असल्याने रस्त्यावर त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी रोहित हागावणे याने रमेश चव्हाण यांना त्यांचा कुत्रा घेऊन जाण्यास सांगितले त्या वरून रोहित आणि रमेश यांच्यात वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, रमेश ने रोहितला विटा दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात रोहित जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडला त्या नंतर ही रमेश ने रोहितला जमिनीवर पाडून अक्षरशः जीवघेणी मारहान करण्यात आली.

तुम्ही मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं – अजित पवार

Related Posts
1 of 1,291

रोहितची आरडाओरड पाहून काही गावकरी घटना स्थळाकडे धावले आणि रोहितला रमेशच्या तावडीतून कशीबशी सुटका केली.  त्या नंतर रोहितला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र  रोहितची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी  त्याला उपचारासाठी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला.  नातेवाईकांनी रोहितला सावंगी मेघे येथे दाखल केले उपचार सुरू असताना रोहितचा मृत्यू झाला. या घटने नंतर माळ मासोला गावावर शोककळा पसरली  पोलिसांनी आता या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे .

  हे पण पहा –   रेखा जरे हत्याकांडात डॉक्टर निलेश शेळके चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: