कुकडी  आवर्तन १ फेब्रुवारी पासून सुरू…….

0 19

पुणे – नारायणगाव-  कुकडी प्रकल्पा अंतर्गत  धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या  सिंचनासाठी पहिल्या टप्प्यात एक फेब्रुवारी पासून कुकडी डावा कालव्यात तर दहा फेब्रुवारीपासून पिंपळगाव जोगे व इतर कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. वहनव्यय, गळती, बाष्पीभवन आदींचा विचार करता कुकडी प्रकल्पातून चाळीस दिवसात ७.२० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून या पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्यातील १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी होणार आहे.

 

                       बाळ बोठे विरोधात खंडणीची गुन्हा दाखल

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, संजय शिंदे, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक विलास रचपुत आदी उपस्थित होते.

कुकडी प्रकल्पात आज अखेर  २१.५३ टीएमसी(७२.५६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी प्रकल्पात आज अखेर २७.७३ टीएमसी(९३.४६  टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रकल्पात ६.२० टीएमसी(२०.९० टक्के) कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने रब्बी अवर्तनाच्या नियोजनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.

 

Related Posts
1 of 1,292

       हे पण पहा –   बाळ बोठे याने घरात घुसून वारंवार केला विनयभंग

एक फेब्रुवारी पासून येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात होणार असून चाळीस दिवसांत  ४.२० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. येडगाव धरणात डिंभे डावा कालव्याव्दारे पाणी घेण्यात येणार आहे. दहा फेब्रुवारी पासून पिंपळगाव जोगे, मीना शाखा व इतर कालव्यात पाणी २.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.आवर्तन कालावधीत कालव्यातुन पाणी चोरी करणारावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.

 आपल्या दमडी दमडीचाही हिशोब त्यांनी ईडीला द्यावा – आशीष शेलार 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: