कुकडीच्या कोळवडी कार्यालयातुनच होणार कर्जतच्या पाण्याचे नियोजन आ.रोहित पवारांच्या पाठपुराव्याने कुकडी कार्यालयांच्या स्वतंत्र विभागणीस मान्यता.

1 193

मिरजगांव- कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांसाठी महत्वपुर्ण असलेल्या कुकडी प्रकल्प डावा कालव्याच्या विभागलेल्या कर्जत व श्रीगोंदा क्षेत्राच्या पाणी नियोजनासाठी आता स्वतंत्र कार्यालयाला शासनाने मान्यता दिल्याने शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या नियोजन व पाठपुराव्यामुळे सुटला आहे.


        शासनाच्या मान्यतेनुसार श्रीगोंदा कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२ यांच्या अंतर्गत असलेल्या राशीन कुकडी पाटबंधारे उपविभागाचे प्रशासकीय नियंत्रण,यंत्रसामुग्री व साधनसामग्री ही स्वतंत्ररित्या कोळवडी याच विभागाकडे सोपवण्यात आली असुन श्रीगोंदा आणि कोळवडी कार्यालयाची स्वतंत्र विभागणी करण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत कुकडीच्या पाणी नियोजनात विस्कटलेल्या घडीवर योग्य मेळ बसणार आहे.श्रीगोंदा येथील अधिकाऱ्यांना त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांवर योग्य लक्ष देता येणार असून कर्जतच्या अधिकाऱ्यांनाही येथील शेतकऱ्यांवर लक्ष देता येणार आहे.


   कुळधरण सिंचन शाखा कुळधरण,येसवडी सिंचन शाखा क्र.१ कुळधरण,येसवडी सिंचन शाखा क्र.२ राशीन या तीन शाखांचे या मंडळाअंतर्गतच कार्यकारी अभियंता कुकडी वितरण बांधकाम विभाग कोळवडी  या विभागाकडे हे कार्यक्षेत्र सोपवण्यात आले आहे.त्यामुळे कर्जत आणि श्रीगोंदा या दोन्ही तालुक्यांच्या कुकडीच्या पाणी नियोजनाचा स्वतंत्र मार्ग मोकळा आणि सोयीस्कर झाला आहे.

Related Posts
1 of 548


कर्जत तालुक्यातील राशीन मंडमंडळांतर्गत असलेल्या कुकडी पाटबंधारे उपविगाभाकडे कर्जत व जामखेड तालुक्यातील सिंचन क्षेत्र असुन श्रीगोंदा वगळल्याने यात योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.कुकडी डावा कालव्याचे एकुण लाभक्षेत्र हे २९,९८९ हेक्टर एवढे असुन कर्जत तालुक्यातील कोळवडीच्या कुकडी बांधकाम विभागाकडे कालव्याचे बांधकामाधीन क्षेत्र आहे.मात्र हे क्षेत्र श्रीगोंदा व कोळवडी या दोन कार्यालयांमध्ये विभागलेले आहे.कार्यालयांच्या या विभागणीमुळे कुकडीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना या कार्यालयाशी संपर्क साधुन आपल्या अडचणी सोडवण्यास अडथळा निर्माण होत होता.शेतकरी व अधिकारी यांचाही मेळ बसत नव्हता.आवर्तन सुटल्यानंतर पाणी वाटपाबाबत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समन्वय राहत नसल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.


    कोळवडी विभागाचे श्रीगोंदा विभागाकडे असलेले प्रशासकीय नियंत्रण हे कोळवडी याच विभागाकडे राहणार असुन शासनाने काही अटींच्या आधीन राहून मान्यता दिलेली आहे.


    उपविभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय नियंत्रणातील बदल हे दि.१४ सप्टेंबरपासूनच कार्यान्वित होणार आहेत.
     आ.रोहित पवारांच्या कुकडी पाणी नियोजनातील हे मोठे पाऊल आहे.कुकडी प्रकल्पाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून योग्य नियोजनाचा उत्तम पायंडा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कित्त्येक दशकानंतर प्रथमच अनुभवला आहे.आ.रोहित पवारांनी शेतकऱ्यांचे खरे हित जाणल्याने आता त्यांची ही ‘पॉवर’ शेतकऱ्यांसाठी फेवर ठरू लागली आहे.
पाणी वाटपात तालुक्यांना योग्य न्याय मिळेल


       कर्जतचे नियोजन श्रीगोंदा विभागाकडे असल्याने अधिकारी आणि शेतकरी यांचाच मेळ बसत नव्हता.कार्यालयांच्या स्वतंत्र विभागणीमुळे कर्जतसह श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही योग्य न्याय देता येईल. कोळवडीच्या एकाच विभागातुन आता कर्जत तालुक्याचे नियोजन करणे सोपे जाईल.यामुळे दोन्हीही तालुक्यांना योग्य न्याय मिळेल असा विश्वास वाटतो.आता सीना प्रकल्पाचेही नियोजन कोळवडी कार्यालयात आणण्याचा माझा प्रयत्न आहे.असे आमदार रोहित दादा पवार म्हणाले.

Show Comments (1)
error: Content is protected !!
%d bloggers like this: