का घसरत आहे सोन्याची किंमत ?

0 122

नवी दिल्ली –  सोन्याच्या किंमती सलग तिसऱ्या दिवशी कमी झाल्या आहेत. याचा कारण म्हणजे अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे विदेशी बाजारात सोन्याचे दर २ टक्क्यांनी कमी होऊन १८६२ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. या मुळे देशांतर्गत बाजारात सोने गेल्या महिन्यातील सर्वोच्च स्तरापेक्षा ६००० रुपये प्रति तोळाने कमी झाले आहे.

गेल्या महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर गेले होते. या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर आतापर्यंत जवळपास ६००० रुपयाांनी सोन्याची किंमत कमी झाली आहे . ७ ऑगस्ट रोजी एमसीएक्सवर सोन्याचे दर ५६००० रुपये प्रति तोळापेक्षाही अधिक होते. तर सराफा बाजारात सोन्याचे भाव ५६,२०० प्रति तोळावर पोहोचले होते. आता सोन्याचे दर कमी होऊन ५१ हजार प्रति तोळाच्या आसपास पोहचले आहे .

Related Posts
1 of 24

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये  सोन्याचे दर घटल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. आधीच्या ट्रेडमध्ये सोने ५१,३६४ रुपये प्रति तोळा होते.  कोरोना व्हायरसच्या  संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये आता सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. डॉलरची किंमती मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती घसरत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: