का ? केला सनी लिओनी ने अप्रत्यक्ष पणे कंगना वर हल्ला……..

मुंबई – कंगना रणौत याने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका करताना सॉफ्ट पॉर्नस्टार असा उल्लेख २-३ दिवस पूर्वी केला होता. टीकेनंतर कंगनावर जेव्हा चारीबाजूने कंगनावर हल्ला झाला तेव्हा त्याने अभिनेत्री सनी लिओनीचा दाखला दिला होता. आता याप्रकरणात सनी लिओनीनेही कंगनाला अप्रत्येक्ष पणे उत्तर दिला आहे.
सनी लिओनीने सोशल मीडियावर पोस्ट करत अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ती त्या पोस्ट मध्ये म्हणली ज्या लोकांना तुमच्याबद्दल काही माहिती नसते तेच लोक तुमच्याबद्दल बोलत असतात हे खूपच हास्यासपद आहे असं सनी लिओनीने म्हटलं. कंगनाने उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका करताना सनी लिओनीचाही उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर सनी लिओनीने केलेली पोस्ट महत्त्वाची आहे. सनीने आपल्या पोस्टमध्ये कंगनाचा उल्लेख केला नसला तरी तिचा रोख नेमका कुणाकडे आहे हे दिसून येतं.
संपूर्ण जगात सुरु असलेल्या गोष्टींवर लक्ष आहे असे कॅप्शन सनीने आपल्या एका फोटोपोस्टला दिले आहे. या फोटोमध्ये ज्या लोकांना तुमच्याबद्दल जास्त माहिती नसते तेच लोक तुमच्याबद्दल जास्त बोलतात हे खूपच हास्यासपद आहे असं सनी म्हणते महत्वाचे म्हणजे सनी लिओनीने या पोस्टमध्ये कुणाचेही नाव घेतलेले नाही. परंतु पोस्टमधून तिने कंगनावर निशाना साधला असावा अशी चर्चा मनोरंजन विश्वात आहे.