DNA मराठी

कांदा निर्यात बंदी वर जिल्हा काँग्रेस आक्रमक

0 94

अहमदनगर- संपूर्ण देश जेव्हा लॉकडाऊन होता त्यावेळेस   शेतकरी शेतामध्ये राबवून अन्नधान्य पिकवत होता.

आधीच हवालदिल असलेल्या शेतकऱ्यास केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घालून मोठी चपराक दिली आहे . कांद्याला चांगला भाव मिळून चार पैसे मिळतील अशा आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना या सरकारने कांदा निर्यात बंदी घालून घोर अन्याय केला आहे.


त्यामुळे सरकारने या निर्णयावर पुन्हा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा कॉंग्रेस पक्ष या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा आमदार लहू कानडे यांनी दिला आहे.

Related Posts
1 of 2,489


ते पुढे म्हटले की काही महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा ,बटाटा , डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा केली होती आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली होती मग अचानक हा निर्णय फिरण्याची वेळ सरकारवर का आली? हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसोबत केलेला एक विश्वास घात आहे.

त्यावर सरकारने तातडीने पूर्ण विचार करून हे निर्णय बदलावा अशी मागणी आज आमदार लहू कानडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अहमदनगर यांना केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: