
नवी दिल्ली – आधीच दुधाला दर नसल्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत होता . अशातच मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्धरोष पसरला. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे विरोधकांनीही मोदी सरकारवर टीकेचे झोड उठवली होती .राज्यातील राजकीय मंडळीनीदेखील हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली होती. परिस्थिती पाहता अखेर कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
कांदा निर्यात बंदीमुळे सीमेवर कांदा अडवून ठेवण्यात आला होता. पण, आता अडवून ठेवलेल्या कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. शरद पवार यांनी पियुष गोयल यांना कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेकऱ्यांसाठी अहिताचा आहे हे पटवून दिले .
भारत हा कांदा निर्यातदार देश अशी भारताची प्रतिमा आहे . या बंदीमुळे त्या प्रतिमेला देखील मोठा धक्का बसू शकतो असं पवारांचे मत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पियूष गोयल यांना पत्र कांदा निर्यात बंदीचा निर्णय निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी विनंती केली होती.