
देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सामान्यांसहित अनेक राजकीय मंडळी , अभिनेत्यांना कोरोनाची लागण होत आहे.आता काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.धक्कादायक म्हणजे एच के पाटील हे मागील आठवड्यात मुंबईला होते ,त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली होती . त्या बैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांसारखे जेष्ठ नेते उपस्थित होते.
एच.के.पाटील यांना अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली .पाटील यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान आधीदेखील अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांसारख्या अनेक नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली होती.