कल्याण – विशाखापट्टणमराष्ट्रीय महामार्गावर  अपघात तीन जण जागीच ठार   

0 26

अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१  कल्याण -निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराई जवळ रात्री उशिरा खाजगी ट्रॅव्हल बस आणि  सेंट्रो कार मध्ये अपघात झाला आहे . या अपघातात चार जण  ठार झाले आहेत. तीन जण जागीच ठार झाले तर एक जणांचा रुग्णालयात मृत्यु झाला आहे. रामभाऊ शंकरराव कदम, वय ६० रा जायगाव ता.परळी जि. बीड,परमेश्वर लक्ष्मण काळे वय ४० रा.धामणगाव ता.पाथ्री जि परभणी व केशव विठ्ठल बोराटे वय २३ रा मंठा जि जालना असे मृतांचे नावे आहेत.

 

  हे पण पहा – रेखा जरे हत्यांकांड | बाळ बोठेच्या अडचणीत वाढ

रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सुभद्रा हॉटेल समोर त्रिभुनवाडी शिवारात खाजगी बस क्र एम एच ३८ x ८५५५ ही पुण्याहून नांदेडकडे जात असतांना संट्रो कार क्र एम एच १२ सीडी २९१७  ही पुण्याच्या दिशेने चाली असतांना यांचा अपघात होऊन सँट्रो कार मधील तीन जण जागीच ठार झाले असून एक जण उपचारा दरम्यान मृत झाला आहे.

Related Posts
1 of 1,290

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक १४ ब्रास वाळू पोलीसांकडून जप्त 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: