कर्जबाजारीपणा कंटाळून आणखी एक शेतकऱ्याची आत्महत्या 

0 22
जामखेड – तालुक्यातील साकत ग्रामपंचायत हद्दीतील कडभनवाडी येथील कैलास रामचंद्र नेमाने (वय ४२) या शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कडभनवाडी ( साकत ) येथील कैलास नेमाने यांच्याकडे दोन एकर जमीन होती पंधरा दिवसांपुर्वी अर्धा एकर जमीन विकली होती तरीही कर्ज फिटले नव्हते काही कर्ज बॅंकेचे तर काही खाजगी सावकाराचे होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली पंधरा दिवसांपुर्वी अर्धा एकर जमीन विकली होती तरीही कर्ज बाकी होते. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते मोठ्या मानसिक तणावाखाली होते.
Related Posts
1 of 1,292
यातच आज सकाळी अकराच्या सुमारास वाडीच्या जवळ असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची खबर पोलिस पाटील महादेव वराट यांनी जामखेड पोलीसांना दिली पोलीसांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात आणला वैद्यकीय अधिकारी डॉ संजय वाघ यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नेमाने यांना दोन मुले एक विवाहित मुलगी आई, वडील असा परिवार आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: