कर्जत येथे आरेका पाम या रोपांचे मोफत वाटप

0 35

कर्जत – कोरोनाच्या लढ्यात कोरोना रूग्ण, अधिकारी व कर्मचारी यांना मुबलक प्रमाणात प्राणवायु मिळावा यासाठी कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील प्रगती नर्सरीचे संचालक शरद तनपुरे यांच्या वतीने ३२५ आरेका पाम या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. ही रोपे कार्यालयात ठेवण्यात येणार आहेत यामुळे कोरोना रूग्णांना व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणावर प्राण वायु मिळणार आहे. 

यामुळे कार्यक्षमता वाढणार आहे,शरद तनपुरे यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्जत येथील कोरोना सेंटर, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, तसेच नगरपंचायत सह सर्व शासकीय कार्यालयात आरेका पाम चे मोफत वाटप करण्यात आले.

Related Posts
1 of 1,375
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: