कर्जत मध्ये भाजपला गळती

कर्जत – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीवर फिदा होत कर्जत नगरपंचायतीच्या विद्यमान दोन नगरसेवकांसह पाच जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. भाजपचे नगरसेवक बापुसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सतीष पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमाळी, डॉ. प्रकाश भंडारी आदींचा यामध्ये समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले. यावेळी सुनील शेलार, दादासाहेब थोरात, भास्कर भैलुमे, रवि पाटील आदी उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रवेश करण्यात आणखी प्रवेश आपल्या पक्षात होणार आहेत असे बापूसाहेब नेटके यांनी सांगितले.