कर्जत नगरपंचायतीच्या वतीने लेंडी नदीवर बांधरण्यात साठलेल्या पाण्याचे जलपुजन नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांच्या हस्ते 

0 35

कर्जत –  परिसरात परतीचा पाऊस समाधान कारक झाल्याने येथील सर्व बंधारे भरले आहेत. आज कर्जत नगरपंचायतीच्या वतीने लेंडी नदीवर बांधारयात साठलेल्या पाण्याचे जलपुजन नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, तालुका उपाध्यक्ष रामदास हजारे, शहराध्यक्ष वैभव शहा नगरसेविका उषा म्हेत्रे राऊत, मंगल तोरडमल, हर्षदा काळदाते, वृषाली पाटील, मनिषा वडे, नगरसेवक  अक्षय राऊत, अमृत काळदाते, सतीश समुद्र, संतोष समुद्र आदी उपस्थित होते.

माजी मंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून जल युक्त शिवार योजनेचे काम झाले, ही योजना नामदेवराव राऊत यांनी योग्य पद्धतीने राबविली यामुळे कर्जत शहरालगत पंचवीस बंधारे भरून वाहत आहेत. यामुळे कर्जत शहरातील नागरिक आणि  शेतकरी बांधवांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. कर्जत मध्ये जलक्रांती झाली आहे असे प्रतिपादन नगरसेविका उषा राऊत म्हेत्रे यांनी केले.

Related Posts
1 of 1,371

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: