कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या कडून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन मोफत उपलब्ध करून देण्यात आले

कर्जत- सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. यामध्ये कर्जत शहर व तालुक्यातील अनेक भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. यामुळे कोरोना रूग्णांना गॅस कमी पडू नये यासाठी कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन मोफत उपलब्ध करून दिले.यावेळी नामदेव राऊत म्हणाले की कर्जत मधील उपजिल्हा रुग्णालय मध्ये आमच्या सर्वांच्या आणि तालुक्यातील अपेक्षेप्रमाणे काम करणारे हॉस्पिटलचे डॉ. सुचेता विनय यादव अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय कर्जत आणि सर्व स्टाफ यांच्या जिद्दीने कर्जत मध्ये कोरणा बाधित रुग्णांना आज चांगल्या प्रकारे उपचार मिळत आहे.
कोरोना या रोगापासून लढण्यात ऑक्सिजन हे मोठ्या प्रमाणातमदत करत आहे याची पाठपुरवठा सरकार करत आहे तरीपण काही सामाजिक संघटनांने सुध्दा पुढे येऊन यासाठी पाठपुरावा कराव्या उपजिल्हारुग्णालयाचे अध्यक्षा डॉक्टर सुचिता यादव यांनी तीन-चार दिवस पूर्वी आमच्याशी संपर्क साधला होता.कर्जत तालुक्यामधील भारतीय जनता पक्षाचे भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ मनिषा वडे तसेच नगरसेविका सौ उषाताई अक्षय राऊत आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज कर्जत उपजिल्हा रुग्णालयाल मध्ये ऑक्सीजन मोफत भरून देण्याचे काम करण्यात आले.