कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व कुटुंबांची आरोग्य तपासणी होणार –   रोहित पवार

0 164

कर्जत –  माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा शुभारंभ आज कर्जत येथे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार म्हणाले  सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. यामुळे कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत.

यासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केले आहे. ही योजना सर्व सामान्य जनतेसाठी फलदायी आहे. या योजनेत कर्जत जामखेड तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशाताई, शिक्षक, कोरोना योद्धा यांचे मार्फत मतदारसंघातील सर्व कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

Related Posts
1 of 2,057

 यामुळे रूग्ण वाढीला आळा बसेल यावेळी प्रांत अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे, कर्जत पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कानगुडे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती उमेश परहर, कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे आदी उपस्थित होते. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: