करोना बाधितांची संख्या वाढतेय हा काळजी वाटणाराच विषय आहे- राजेश टोपे

अहमदनगर – करोना बाधितांची संख्या वाढतेय हा काळजी वाटणाराच विषय आहे. त्यात दुमत काहीच नाही. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून त्यांना शिक्षित करणे व सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे बंधनकारक करणे आज गरजेचे आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी जे मास्क वापरत नसतील, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसतील, त्यांना कुठेतरी दंड लावावच लागेल. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
ते अहमदनगरमध्ये बोलत होते ते म्हणाले अहमदनगर जिल्हामध्ये १० हजार पेक्षा जास्त कोरोना रूग्ण सापडले आहे. या मुळे आज जिल्हा मध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पळण करावे आणि मास्कचा वापर बंधनकारक करावे असे मत त्यांनी मांडले आहे.
दरम्यान काल जिल्ह्यात ८६५ कोरोना बांधीत मिळाले आहे. या मुळे एकूण आकडा २९ हजार ५१४ झाला आहे.