
मुंबई – राज्यात सध्या कंगना आणि शिवसेना यांच्या मध्ये वाद सुरु आहे. कंगना रणौत मुंबईत आल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना या वादामध्ये आणखी भर पडली आहे. शिवसेना विरुद्ध कंगना हे ट्विटरवर गेले अनेक दिवसपासून वाद सुरू आहे.पण या सगळ्यात शिवसेनेच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना या विषयावर न बोलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरेंचं नाव घेत कंगनाने मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं होतं त्यावर आता तर तिने थेट बाळासाहेब ठाकरेंवरून ट्वीट केलं आहे. सत्तेसाठी शिवसेना ही ‘सोनिया सेना’ झाली आहे. शिवसेनेनं सत्तेसाठी बाळासाहेबांचा विचार सोडला अशा शब्दात कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर माझं घर बीएमसीने नाही तर गुंडांनी तोडलं असंही कंगनाने ट्वीटमध्ये काल म्हटलं होते .
यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रियाआता पर्यंत देण्यात आली नाही.शिवसेनेच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना अजूनही या विषयावर न बोलण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. कालही शिवसेनेने या विषयावर कोणीही न बोलण्याचा आदेश दिला होता. अजूनही शिवसेनेचं या विषयावर मौनच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यावर कधी बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही , असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचं नाव घेत धमकी दिली आहे.
दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि सोशल मीडियावर युद्धाला तोंड फुटलं. कंगनाचे समर्थक तिची बाजू घेत असले, तरी मुंबईकर कंगनावर चांगलेच नाराज झाले आहे. मुंबई महापालिकेच्या या कारवाईस सुरूवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा मुंबईला पाकिस्तान असल्याचं म्हटलं. मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता पीओके झाली आहे असं ट्वीट त्याने काल केले होते.