कंगना प्रकरणात रामदास आठवले यांनी दिली हि प्रतिकिया…….

मुंबई- मुंबई सर्वांची आहे कोणालाही घाबरायचे काही कारण नाही मुंबई कोणा एकाची नाही ती सर्वांची आहे शिवसेना-भाजप-रिपाइं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांची आहे .
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे यामुळे मुंबईमध्ये राहण्याच्या अधिकार सर्वांना समान आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी अभिनेत्री कंगना राणावत यांची भेट घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना विरुद्ध कंगना राणावत यांच्या वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे या वादामध्ये गुरुवारी आणखी भर पडली त्याच्या कारण म्हणजे मुंबई महानगरपालिका ने कंगना राणावत यांच्या कार्यालयावर चालवलेला हातोडा आहे .
यात सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल मुंबईत कंगणा रौनात यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली त्यांची एका तास भेट झाल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांची संवाद साधला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख तिने रागाच्या भरात केले होते. त्यांचं एकेरी उल्लेखाचे मी समर्थन करणार नाही.
परंतु कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयावर केलेली कारवाई हि सूड घेण्याच्या उद्देशाने केल्याची दिसत आहे. राज्यात आणि मुंबईत शिवसेनेचे सरकार आहे. कंगना चुकीचे वागली होती तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती. हा सगळं वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टाळू शकले असते. मात्र तसे न झाल्याने या सर्व प्रकरणाला सरकारचा पाठींबा होता. असा संशय घ्यायला वाव असल्याचे ते म्हणाले .