कंगनाला संजय राऊतचा प्रतिउत्तर

मुंबई – मुंबई पोलिसांबद्दल कुणीही काहीही बोलत असतील तर त्यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी जे काल वक्तव्य केला होता या मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी आज दिला.
या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे.२६/११च्या हल्या पासून मुंबई पोलिसांनी वाचवला तसेच कसाबला याच पोलिसांनी पकडलं अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही काहीही बोलत असतील तर त्यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी असे राऊत म्हणाले.“मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनाचे कान टोचले.मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणारे जे कोणी आहेत, त्यांना मुंबईत मतं मागताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला POK ने मतं दिली का? असा सवाल संजय राऊत यांनी भाजप आमदार राम कदम यांना विचारला.मला धमकी वगैरे देण्याची सवय नाही, आम्ही डायरेक्ट अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
काय म्हणाली होती कंगना –
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे? असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता. यावर संजय राऊत यांनीही ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा टोला कंगनाला लगावला होता. बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी असंही कंगना म्हणाली होती. आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली.