कंगनाने करण जोहरवर साधला निशाणा


मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौतने बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीवर निशाणा साधला आहे, गेल्या काही दिवसांपासून ती कलाविश्वातील बड्या कलाकारांना सुशांतच्या अत्महत्येसाठी कारणीभूत ठरवत आहे. यामध्ये तिने प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हा मुख्य आरोपी असल्याचा आरोप लावला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने करण जोहरवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील टॅग केले आहे. मुवी माफिया गँगचा करण मुख्य सूत्रधार आहे. त्याने आतापर्यंत अनेक कलाकारांच्या स्वप्नांना नष्ट केलं आहे. तरी देखील तो आज बिनधास्त फिरत आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. याठिकाणी आपल्यासाठी कोणती आशा नाही?’ असा प्रश्न देखील तिने उपस्थित केला.
दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणासंबंधित रोज नवनवे खुलासे होत आहे. यावर कंगना आपले स्पष्ट मत व्यक्त करत बॉलिवूडमधील प्रस्थापितांवर निशाणा साधत आहे. कलाविश्वातील गटबाजी आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर आवाज उठवला. इतकंच नव्हे, तर आता तिनं याच कलाविश्वाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे.शिवाय या प्रकरणात आपण आपल्या करिअरलाच नव्हे, तर स्वत:लाही धोक्यात टाकल्याची भीती व्यक्त करत तिने केंद्राकडून संरक्षणाची मागणी केली आहे. त्यानंतर तिला सुरक्षा देण्याची मागणी अनेक चाहत्यांनी केली.