कंगनाची पुन्हा मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी वर टीका ………. 

0 49

मुंबई – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सातत्यानं बॉलिवूडमधील काही कलाकारांवर टीका करणाऱ्या कंगना रणौतनं मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. आता परत कंगनाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे.  

ती म्हणाली मुंबईत गुंडाराज चालू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री आहे. हे ट्विट कंगनाने साहिल चौधरी या  यू-ट्यूबला अटक केल्यानंतर कंगनानं ट्विट केलं आहे आणि मुख्यमंत्री साबोत काँग्रेसवर ही टीका केली आहे. साहिलनं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्यांच्याविरोधात अचानक गुन्हा दाखल केला. 

Related Posts
1 of 1,420

त्यानंतर साहिलला तात्काळ तुरूंगात टाकण्यात आलं. पण, पायल घोषनं अनुराग कश्यपविरोधात अनेक दिवसांपूर्वी बलात्तकाराचा गुन्हा दाखल केला आहे. पण, तो मुक्तपणे फिरतोय. हे सगळं काय आहे असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे तसेच ती पुढे म्हणाली जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यंत्र्यांना त्यांच्या टीमला कुणीही प्रश्न विचार नाहीये. त्यांनी आमच्यासाठी काय केलं? आमचं घर तोडलं आणि आम्हाला मारलं? याला उत्तरदायी कोण आहे, असा प्रश्न कंगनानं काँग्रेसला विचारला आहे.  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: