ऑस्ट्रेलिया संघ ३३८ वर ऑल आउट !!

0 26

सिडनी – तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजापुढे ऑस्ट्रेलिया फलंदाजांनी सरेंडर केला आहे. रवींद्र जडेजाने भेदक मारा करत ऑस्ट्रेलिया संघाचे ४ बळी घेतले तर आपल्या पहिला कसोटी सामना खेळणार नवदिप सैनीने दोन बळी घेतले आहे. तर जसप्रीत बुमरहाने  २ आणि मोहम्मद सिराजने एक बळी घेतला आहे.

ऑस्ट्रेलियातर्फे स्टीव्हन स्मिथने शतकिय खेळी करत १३१ धावा केले आहे. तर लाबुशेनने ९१ धावा केले आहे. या दोन फलंदाज व्यतिरिक्त भारतीय ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त धावसंख्या करण्याची संधी दिली नाही.

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर लाबुशेन-स्मिथ यांनी संयमी फलंदाजी केली. तिसऱ्या विकेटसाठी -स्मिथ यांनी १०० धावांची भागिदारी केली. या भागीदारीला रविंद्र जाडेजाने मोडली. रवींद्र जडेजाने लागोपाठ दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले.

Related Posts
1 of 47

दरम्यान दुसऱ्या दिवशीही पावसानं व्यत्यय आणल्यामुळे दोन वेळा सामना थांबवण्यात आला होता. थोडावेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: