ऑनलाईन सभा रद्द ; तांत्रिक अडचणी


श्रीरामपूर : श्रीरामपूर पालिकेची आज व्हीसी होणार होती पण काही तांत्रिक अडचणींमुळे सभा रद्द करण्यात आली आहे . नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी काळ उशिरा पत्रक काढून सभा रद्द करण्यात आल्याची माहिती नगरसेवकांना दिली . जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पुढची सभा होणार आहे . मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्या उपस्थितीत होणारी हि पहिलीच सभा होती . याआधीच्या सभा सभागृहात प्रत्यक्ष पार पडायच्या पण कोरोना संकटामुळे व्हीसीद्वारे होणार होती , या सभेला विशेष महत्वही होत या सभेत २३ विषय घेण्यात आलेले होते , अर्थविषयक कामांचा प्रामुख्याने समावेश या सभेत होणार होता . काहींचे मत आहे की हि सभा प्रत्यक्ष व्हावी अशी माहिती मुख्याधिकारी ढेरे यांनी दिली .