ए  सी बी चे पोलीस उपअधीक्षक  हरिष खेडकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

0 85
Related Posts
1 of 2,047

अहमदनगर : लाचलुचपत प्रतीबंधक विभागाचे पोलीस  उपअधीक्षक  हरिष खेडकर यांना स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती पदक जाहीर  झालेय ,ते  मूळचे श्रीगोंद्यातील असून प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण श्रीगोंद्यातच झालेय नंतर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापू येथील कृषी महाविद्यालयात झाले . हरीष  खेडकर हे पोलीस दलात सरळ सेवा पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र आयोगामार्फत १९९२ मध्ये रुजू झाले. १ वर्ष नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी  मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून लोहमार्ग , नागपूर ,जालना,पुणे, सातारा , बुलढाणा , ठाणे , बीड , उस्मानाबाद , औरंगाबाद ग्रामीण या ठिकाणी सेवा केली. यामध्ये अनेक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करून आपली छाप पाडली . आत्तापर्यंत ४३१ बक्षिसे तर ४५ प्रशंसापत्रे  मिळाली . पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे , पोलीस अधीक्षक अखिलेश कुमारसिंह  यांनी हरीश खेडकर यांचे अभिनंदन केले .  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: