ए मास्क वर घेऊन बोल , अजित पवारांचा कर्मचाऱ्याला इशारा !

0 41

राजकीय वर्तुळ अजित पवार आपल्या लहरी स्वभावामुळे ओळखले जातात .सध्या देशात कोरोनाचा कहर कायम आहे. करोनाचा प्रसार वाढू नये म्हणून नेतेमंडळी जनजागृती करताना दिसत आहे.अजित ओव्हर देखील वारंवार लोकांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन करतात .अजित पवार स्वतःदेखील . राज्यात फिरताना तोंडाला मास्क आणि हातात ग्लोव्हज घालूनच येतात .एका कर्मचाऱ्याने मास्क न लावल्यामुळे अजित पवारांनी त्याला दम भरला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा चार चाकी वाहनाचे उद्घाटन वेळी माहिती देणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं मास्क खाली घेतला होता. ते बघून, ए मास्क वर घेऊन बोल, असा सल्ला अजित पवारांनी त्याला दिला .

Related Posts
1 of 253

कोरोना महामारीनंतर अजित पवार यांनी लोकांशी हस्तांदोलन करणंही बंद केलं आहे. तसेच कार्यकर्त्यांना कोणत्याही कार्यक्रमांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.जसे राजकीय नेतेमंडळी काळजी घेताना दिसत आहेत तशीच आपणदेखील स्वतःची काळजी घ्यायला हवी .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: