एसटी बस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,’या’ दिवशी मिळणार थकबाकी !

0 171

कोरोनामहामारीमुळे झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक उदयॊग व्यवसायांना फटका बसला.यामध्ये सर्वात जास्त फटका बसला तो म्हणजे एसटी बसला.मात्र आता जनजीवन सुरळीत होऊ लागले आणि पाच महिन्यांपासून ठप्प झालेली राज्याची लालपरी धावू लागली आहे.मात्र तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत.आता लवकरच त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळणार आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबद्दल ट्वीट करून एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Related Posts
1 of 2,052

येत्या गुरूवारी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार मिळणार आहे.याबाबत अनिल परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.या भेटीतकर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल .तसेच उरलेले पगारही लवकरच दिला जाईल.

दरम्यान, २० ऑगस्टपासून राज्यात एसटी बस वाहतूक सुरू करण्यात आली होती. आता पूर्ण आसन क्षमतेने बससेवा चालवली जात आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: