एमपीएससी परीक्षेच्या नवीन तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर

0 26

नवी मुंबई –  राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेच्या नवीन तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.   राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

आयोगाने याबद्दल एक माहिती देताना एक प्रसिद्धीपत्रक कडून याबद्दल माहिती दिली आहे कि राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, ११ एप्रिल २०२१) रोजी होणार आहे.

३०२ चा गुन्हात १६९ची तयारी, खुनातील आरोपीला ताब्यात घेऊन सोडले. गुटका किंगला आशीर्वाद कुणाचा, पोलीस अधीक्षक चौकशी करणार का?

Related Posts
1 of 1,290

या पूर्वी आयोगाकडून सन २०२० मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे दिनांक संदर्भिय दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्राकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शासानाकडून ऐनवेळी निर्णय घेण्यात आला व तसे आयोगास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले. शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय लक्षात घेऊन रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्राकद्वारे तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या दोन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत  १३ ऑक्टोबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाकडून घोषित करण्यात आले.

            महिलेशी डेटिंग अ‍ॅपवर झाली ओळख, लग्नाचा आमिष दाखवून आरोपीने केला बलात्कार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: