एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आगामी काळात येणाऱ्या ३ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहेवेळापत्रक नुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा येणाऱ्या ११ ऑक्टोबरला तर दुय्य्म सेवा अराजपत्रिक गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
या पूर्वही हे परीक्षा एप्रिल/ मे महिन्यातच पार पडणार होते.परंतु कोरोनाच्या’प्रभावा मुळे या परीक्षेचे वेळापत्रकात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन बद्दल करण्यात आले होते. या परीक्षांच्या वेळी कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी आयोगाकडून सर्व उपाय योजना करण्यात येणार आहे असे आयोग मार्फत सांगणायत आले आहे. या दरम्यान दुय्य्म सेवा अराजपत्रिक गट ही परीक्षा नीट साबोत होणार होती. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यास आली आहे.