एमआयएम चे खासदार जलील पोलिसनच्या ताब्यात

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार आहे अशी घोषणा केली होती. त्यानुसार ते औरंगाबादेतील शहागंज मशिदीत प्रवेश करण्यासाठी निघाले होते.ते आपल्या कार्यालयापासून चालत रवाना झाले असताना वाटेत पोलिसांनी त्याना अडवत त्यांना ताब्यात घेतले.
इम्तियाज जलील काही कार्यकर्त्यांसह शहागंज मशिदीत जाऊन नमाज अदा करणार होते. त्यांनी कार्यालयापासून चालत आंदोलनाला सुरुवात केली होती. परंतु वाटेतच औरंगाबाद पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर जलील यांना पोलिसांच्या गाडीत बसवून ताब्यात घेतले. इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अद्याप धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. असं असतानाही इम्तियाज जलील यांनी केलेल्या या घोषणेमुळे पोलीस प्रशासन आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.