एनडीएमधून अकाली दल बाहेर: शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल !

0 164

राजकारणात पक्षप्रवेश करणे , पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे हे काही नवीन नाही. असेच काहीसे आता भाजपसोबत घडत आहे. अगोदर शिवसेनेने भाजपाची साथ सोडली आणि आता अकाली दल देखील भाजप पासून वेगळे झाले.शिवसेना आणि अकाली दल या दोन्ही पक्षांनी ‘एनडीए’ला राम राम ठोकल्याने शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे. एनडीएत खरंच राम उरला आहे काय? असा खोचक सवाल शिवसेनेने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला विचारला आहे.

कृषी विधेयकावरून झालेल्या मतभेदामुळे अकाली दल एनडीएमधून बाहेर पडले आहे.शिवसेनेने सामना च्या अग्रलेखात टीका करत म्हटले आहे – महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उत्तम चालले आहे.आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे.ज्या कारणांसाठी एनडीए स्थापन झाली ते कारण आता नष्ट झाले. सध्या तरी अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांबही कलथून गेला आहे.

Related Posts
1 of 546

सध्याची एनडीए ची स्थिती पाहता नवा सूर्य उगवेल काय?असा खोचक सवालदेखील सेनेने उपस्थितीत केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: