एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का , शरद पवारांनी केला मोठा खुलासा !

0 38


भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच आता खडसे शरद पवार यांची भेट घेणार आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या भेटीमुळे खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.मात्र शरद पवारांनी हा केवळ चर्चेचा विषय असून हा दावा फेटाळून लावला .

शरद पवारांनी स्पष्ट केले की, एकनाथ खडसेंसोबत भेटीचा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. तसेच खडसेंकडून देखील भेटीबद्दल कोणती विनंतीही करण्यात आलेली नाही.दरम्यान एकनाथ खडसे यांनीदेखील आपण वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आलो असल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे पुन्हा एकदा खडसे राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे केवळ वृत्त च आहे .

Related Posts
1 of 257

याआधीदेखील शरद पवारांच्या अध्यतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकनाथ खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याची अफवा आहे . मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: