एकनाथ खडसे करणार का राष्ट्रवादीत प्रवेश, जाणून घ्या !

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार या वृत्ताने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा झाली अशी माहित आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नकार देत हे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
सुधीर मुनगंटीवार यांचीदेखील एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे.जिना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ… असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे हे वृत्त फेटाळले आहे.दरम्यान चंद्रकांत पाटील यांनीदेखील एकनाथ खडसे पक्षप्रवेश सारखी अशी कोणती भूमिका घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे.
एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत .सध्या ते नाराज असून देवेंद्र फडणवीसांवर टीका करीत आहेत.
तसेच आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे . त्यातच आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे .