DNA मराठी

ऊसतोड मजुरांना सरकारने न्याय द्यावा – प्रकाश आंबेडकर

0 77

पुणे – ऊसतोड मजुरांना राज्य सरकारने न्याय द्यावा.अन्यथा १ ऑक्टोबर रोजी होणारा आमच्या संप अटळ असेल, असा इशारा आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांसंदर्भात आंबेडकर यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आणि माध्यमांशी संवाद साधून ते म्हणाले १ ऑक्टोबरनंतर ऊसतोड मजूर कामावर जाणार नाहीत. ऊतसोड मजुरांची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, तसेच त्यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी या दोघांचही नुकसान होऊ नये, हे शासनानं पहावं.

Related Posts
1 of 2,489

आम्ही १ तारखेला संप करणारच आहे. यासंदर्भात लवकरात लवकर आम्ही मेळावा घेणार आहे. त्या मुळे शासनानं मेळावा घेण्यासाठी परवानगी देऊ किंवा न देऊ हा मेळावा तर होणारच. 

या मेळाव्यामध्ये आमची भूमिकाही जाहीर केली जाईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की, त्यांनी यात लक्ष घालावं आणि ऊसतोड मजुरांना न्याय द्यावा.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: