उत्तर प्रदेश सरकारची मनमानी हा देशातील लोकशाही आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे- सत्यजित तांबे

हाथरस – येथे झालेल्या सामूहिक बलात्कार पीडिताच्या कुटुंबांना भेट देण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी यमुना एक्सप्रेस वें याठिकाणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या गाड्या अडवले तेव्हा राहुल आणि प्रियंकाने हाथरस येथे पायी जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत अटक केली या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष युवा सत्यजित तांबे यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या अटकेच्या निषेधार्थ आपापल्या भागामध्ये आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे .
तसेच उत्तर प्रदेश सरकारवर त्यांनी टीका केली आहे ते म्हणाले उत्तर प्रदेश सरकारची मनमानी हा देशातील लोकशाही आणि मानवतेला काळीमा फासणारी त्याचा आम्ही निषेध करतो.