इ नाम योजनेचा फज्जा

0 36

अहमदनगर-केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या तीन नवीन कृषी कायद्या पूर्वी राष्ट्रीय कृषि बाजार योजना २०१६ पासून सुरू केली होती.
बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे पारंपारिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी ऑनलाइन लिलावासाठी ई -नाम हे व्यापार पोर्टल तयार करण्यात आले होते.

पारंपरिक पद्धतीच्या लिलाव ऐवजी ऑनलाईन लिलावाद्वारे शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे उद्दिष्ट यात होते .मात्र नगर जिल्ह्यातील नगर, नेवासा, राहुरी, राहता, संगमनेर, श्रीरामपूर बाजार समित्यांमध्ये ही योजना कुठेच वापरात दिसत नाही .उलट पारंपारिक पद्धतीने सर्वत्र लिलाव होत असल्याचे दिसत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी १४ एप्रिल २०१६ रोजी या योजनेस सुरुवात झाली होती. यानुसार शेतकऱ्यांना य ई नाम पोर्टलवर नोंदणी करावी लागते त्यानंतर बाजार समितीत शेतमाल आणून त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि त्याचा अहवाल शेतकऱ्यास मिळतो मोबाईल वरून शेतकरी,व्यापारी कुठेही बसून लिलावात सहभाग घेऊ शकतो.

Related Posts
1 of 1,371
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: