इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत -निलेश राणे

0 26
नवी मुंबई –  धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावई समीर खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून  करण्यात आलेली अटक यामुळे मागच्या काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पक्षावर टीका करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दवाब टाकण्याचा प्रयत्न करत आहे.  भारतीय जनता पक्षाकडून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
सर्वात अगोदर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली होती . IPS विश्वास नांगरे पाटील सिल्वर ओक वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्या नंतर  भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करत भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे .त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं .
 तर दुसरा एक ट्विट करत त्यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले कि मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला असं त्यांनी म्हटलं आहे.  अश्या शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.  
Related Posts
1 of 1,323
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल गुरुवारी प्रसार माध्यमाशी बोलताना  म्हणाले कि  धनंजय मुंडे यांच्यावर आरोप गंभीर असून पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. तर नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप नसल्याचं सांगत त्यांची पाठराखण केली आहे. सूत्रापासून मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभेराहणार आहे आणि ते आपला राजीनामा देणार नाही अशी सध्यातरी सूत्रांकडून मिळत आहे.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: