इकडे कोणी भीक घालत नाही तर तिकडे काय…. नीलेश राणे

0 44

मुंबई- सध्या भारतामध्ये बिहार निवडणुकी बाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि या निवडणुकांमध्ये राज्याची मुख्य पार्टी शिवसेना सुद्धा निवडणूक लढणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागेवर निवडणूक लढणार अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती यासाठी आज त्यांनी आपले २० स्टार प्रचारकांची यादी सुद्धा जाहीर केली आहे.

त्यामध्ये स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुद्धा नाव बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून शिवसेनेने जाहीर केले आहे तसेच या यादीमध्ये आणखी शिवसेनेचे मोठे नेत्यांचा समावेश आहे.त्यामध्ये आदित्य ठाकरे, प्रियंका चक्रवती ,संजय राऊत, अनिल देसाई आदींच्या नाव समावेश आहे.

Related Posts
1 of 1,390


मात्र या वीस जणांच्या शिवसेनेने जाहीर केलेली स्टार  प्रचारकच्या यादीवरून भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे त्यांनी सांगितले या स्टार प्रचारकाला आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी विचारत सुद्धा नाही यांना इकडे कोणी भीक घालत नाही आणि हे आता बिहार मध्ये जाऊन स्वतःच्या अब्रू घालवणार त्यांनी सांगितले की शिवसेनेने महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यामध्ये निवडणुकीत आपले उमेदवार दिले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवाराचे आत्तापर्यंत डिपॉझिट जप्त झाले आहे अशा इतिहास सांगतो आणि आता सुद्धा हेच होणार असा सुद्धा त्यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: