आ . नीलम गोऱ्हे यांची बलात्कारित महिलेला संरक्षण देण्याची मागणी


अहमदनगर : अहमदनगर मधील पारनेर येथील एका महिलेवरती काही नराधमांनी बलात्कार केल्यानंतर पीडित महिलेने त्यांची तक्रार केल्यानंतर आरोपींना अटकही झाली . केस चालू असतानाच कोरोनाचा संकट आल्या कारणाने पेरोल वरती आरोपी बाहेर येताच या आरोपींनी पीडितेवरती हल्ला करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये पीडितेची अल्पवयीन मुलगी जखमी झाली असून तिच्यावरती उपचार चालू आहेत. यासंदर्भात आ नीलम गोर्हे यांनी पीडितेची भेट घेऊन , ना अनिल देशमुख , डी जी आणि एस पी यांच्याकडे पीडित महिलेच्या संरक्षणाची मागणी केली तसेच तिला न्याय मिळावा ,आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि पेरोल च्या नियमांचा पालन होतंय कि नाही याची पडताळणी करावी अशी मागणी करून पीडितेच्या उपचारासाठी मदतही हवी आहे त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत महिलेची आर्त हाक पोहोचविणार असल्याचं सांगितलं .