आहारात हे समाविष्ट करा आयरनची कमतरता भासणार नाही

0 22

या वस्तूंना आपल्या आहारात सामील करा या मुळे आयरन ची कमतरता होणार नाही. शरीरात आयरन च्या कमतरतेमुळे थकवा, डोकेदुखी आणि चक्कर येणं सारखे त्रास उद्भवतात. जर आपणास नेहमी अशक्तपणा जाणवत असेल तर आयरन ची कमतरता असू शकते. आयरनच्या कमतरतेमुळे बरेच रोग उद्भवू शकतात. आज आम्ही आपल्या या लेखात आयरन च्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा. जेणे करून शरीरात आयरनची कमतरता होणार नाही. हे सांगत आहोत.

1 बीट-
बिटाचे सेवन केल्यानं शरीरात झालेल्या आयरनच्या कमतरतेला दूर केले जाऊ शकत. ज्या लोकांना आयरनची कमी असते, त्यांना आपल्या आहारात दररोज बिटाचा समावेश केला पाहिजे. दररोज बिटाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.

 

2 पालक –

पालकमध्ये देखील आयरन मुबलक प्रमाणात आढळत. आयरनची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारात पालकाचा समावेश करावा. पालक मध्ये कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फोरस, खनिज आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीरास निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असतं.

Related Posts
1 of 44

3 डाळिंब –
डाळिंबाचे सेवन करणे आरोग्यास खूप फायदेशीर असतं. आयरन च्या कमतरतेला दूर करण्यासाठी आपल्या आहारात डाळिंबाला समाविष्ट करावं. दररोज डाळिंबाचे ज्यूस किंवा रस देखील घेऊ शकता.

4 पेरू –
पेरूचा सेवन केल्यानं शरीरातील आयरनची कमतरता दूर केली जाऊ शकते. पेरू हे पचन तंत्राला मजबूत ठेवण्यासाठी उपयोगी असत. दररोज पेरूचे सेवन करणे आरोग्याला खूप फायदेशीर असत.

5 ड्राय फ्रुट्स-
ड्राय फ्रुट्स किंवा सुकेमेवे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ड्रायफ्रूट्स मध्ये आयरन मुबलक प्रमाणात आढळतं. आपण आयरन ची कमतरता पूर्ण करण्यासाठी शेंगदाण्याचे सेवन देखील करू शकता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: