आशिष शेलार साहेब खरं सांगा दिप सिद्धू तुमचे कोण?? – अमोल मिटकरी

0 32

 अकोला –  दिल्लीत काल झालेल्या ट्रॅक्टर रॅली मधील हिंसाचाराबद्दल  महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाहीत, असा सवाल भाजपचे नेते  आशिष शेलार यांनी मुंबईत एका पत्रकार परिषेदेत उपस्थित केला होता . आता या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  अमोल मिटकरी यांनी उत्तर दिला आहे .   दिल्ली हिंसाचाराला जबाबदार असलेले अभिनेते दीप सिद्धू हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे. त्यावर शेलार का बोलले नाहीत? असा परखड सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच सिद्धू तुमचा कोण लागतो?  असा सवालही त्यांनी केला आहे.

पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं ….?? – निलेश राणे

अमोल मिटकरी यांनी ट्विट करून आशिष शेलार यांना उत्तर दिला आहे .  त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि  आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत. दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत? याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. तर आपल्या दुसऱ्या ट्विट मध्ये अमोल मिटकरी यांनी  आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?, असा परखड सवाल त्यांनी शेलार यांना केला आहे .

आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी हे फारच दुर्दैवी आहे- अण्णा हजारे

Related Posts
1 of 1,301

आपल्या पत्रकार परिषेदत भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले होते कि  आशिष शेलार शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले कि  पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात कसली आलीय देशभक्ती. हे शरद पवारांच्या देशभक्तीच्या व्याख्येत बसतं का ? असा प्रश्न त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना उपस्थित केला आहे. तर या पत्रकार परिषेदत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले कि रोज वचवच करणारे संजय राऊत आज देशातील पोलिसांच्या बाजूनं का बोलले नाहीत? अशी तोफ आशिष शेलार यांनी डागली आहे. तर जवान आणि पोलिसांच्या बाजूनं शरद पवार यांची सोशल मीडिया पोस्ट का आली नाही?, असा प्रश्नही आशिष शेलार यांनी  उपस्थित केला.

 पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात कसली देशभक्ती – आशिष शेलार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: