आरोग्य सेविका ज्योती पवार पहिल्या मानकरी पहिल्याच दिवशी ८८ कर्मचार्‍यांना कोरोना लस आठवडाभर सर्व ८० जणांना लस

0 31

जामखेड – आरोग्य सेविका ज्योती पवार यांनी
कोरोनाची पहिली लस घेऊन लसीकरणाची सुरवात केली आज दिवसअखेर ८८ कर्मचार्‍यांनी लस घेतली. तालुक्यातील एकुण ७९९ आरोग्य कर्मचारी, खाजगी डॉक्टर व अंगणवाडी सेविका यांनी आपली नोंदणी केली आहे.

जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी ग्रामीण रूग्णालयात जाऊन लसीची पाहणी केली यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, डॉ.कुंडलीक अवसरे, डॉक्टर असोशियनचे अध्यक्ष डॉक्टर भरत देवकर, डॉ. शिंदे, डॉ. हांगे, डॉ. प्रविण मंडलेचा, श्याम जाधवर, अधिपरिचारिका सातपुते, माळी आदी उपस्थित होते.

जामखेड शहरामध्ये कोविड १९ लस (७९९) लोकांसाठी आली असून लस देण्याची सुरुवात जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू झाली आहे. कोरोना काळात काम केलेल्या सर्वांना ही लस दिली जाणार आहे. लस देण्याचा पहिला मान जामखेड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेविका ज्योती पवार यांना देण्यात आला आहे. सध्या ७९९ वैद्यकीय क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय (फ्रंटलाईन) कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ म्हणाले, सोमवार पहिल्या दिवशी ८८ कर्मचार्‍यांना लस देण्यात आली या लसीचा परिणाम काय होतो का यासाठी ओम हॉस्पिटल येथे एक स्वतंत्र बेड व डॉक्टरांची फौज तैनात करण्यात आली होती परंतु सुदैवाने कोणालाच त्रास झाला नाही.

Related Posts
1 of 1,301

लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसी करणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि नगरपालिका व महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: