आरास मध्ये “चिमणी वाचवा ” हा सामाजिक संदेश


अहमदनगर : गणपती उत्सव म्हणलं कि आरास आलीच आणि त्या आरास मध्ये अनेक संदेश दिले जातात . मग ते सामाजिक असतात किंवा एखाद्या घटनेवर आधारित देखावा केलेला असतो. अशाच एका पक्षीप्रेमींनी ” चिमणी वाचवा ” चा संदेश देत गणपतीसमोर आरास बनवली आहे . नालेगावमधील पर्यावरणप्रेमी नरेंद्र सोनावणे यांनी घरातील गणपतीसमोर आकर्षक अशी आरास बनवत त्यातून चिमणी वाचवा चा संदेश दिलाय .
ग्रामीण भागात काही प्रमाणात पक्षी दिसतात त्यात चिमण्याही आहेत पण शहरी भागात चिमणी हा प्रकार दिसेनासा झालाय . मोठमोठी टॉवर्स , वायरी , वायू प्रदूषण , हवामान बदल , झाडांची मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड , विषारी फवारणी , अशा अनेक कारणांमुळे चिमण्या राहिलेल्या नाहीत . चिऊताई चिऊताई दार उघड या बालगीतानेच तर आई बाळाला घास भरवते पण त्या चिऊताई च्या घरालाही आता जागा राहिलेली नाही, हरवत चाललेली चिऊताईचा आता विसर पडत चाललंय . समाजाला प्रबोधन व्हावे आणि जनजागृती होण्यासाठी हि आरास त्यांनी केलीये .